MPSC All In One 52000+ Combine B And C Fast Track Rivision Oneliner-Rajesh Bharat,Atul Shetee
₹540.00 Original price was: ₹540.00.₹378.00Current price is: ₹378.00.
Author : Rajesh Bharat,Atul Shetee
ISBN : 104304
Language : Marathi
Edition : 5 TH ( 2026 )
Publisher : Shri Sai Publication
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
MPSC All In One 52000+ Combine B And C Fast Track Rivision Oneliner-Rajesh Bharat,Atul Shetee
नमस्कार मित्रांनो,
माझे परम मित्र श्री. राजेश भराटे सर यांच्या संकल्पनेतून व परिश्रमातून परिपूर्ण सामान्य ज्ञान फास्टटुंक रिविजन वजाइनर हे पुस्तक MPSC द्वारे घेण्यात आलेल्या १९८४ ते २०२१ पर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकेतील दर्जेदार व वारंवार विचारले जाणारे प्रश्न तसेच UPSC/TCS/IBPS/NCERT त्याचबरोबर विविध राज्यांच्या लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न अनुवादीत करून, एकत्र संकलन करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासातील वेळ तर वाचेलच, त्याचबरोबर एकत्र अभ्यास साहित्य मिळाल्याने विविध स्पर्धा परीक्षांचा प्रश्न विचारण्याचा कल देखील लक्षात येईल. याचा निश्चितच विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळविण्याकरिता फायदा होईल, यात तीकमात्र ही शंका नाही.
पुस्तकाची मांडणी अत्यंत साधी, सरळ, सुटसुटीत असल्याने तसेच विषयांनुसार वनलाईन व चार्टवाईज मांडणी असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सुलभ होईल.
बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा चांगल्या अभ्यास असतो, परंतु तरी देखील यशाला गवसणी घालता येत नाही. याची कारणे अभ्यास खूप असतो, परंतु MPSC व इतर परीक्षेचा नेमका पॅटर्न काय आहे व प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे, याचे एकत्र संकलित पुस्तक नसल्याने किंबहुना विद्यार्थी मित्रास पुरेसा वेळ न मिळाल्याने योग्य दिशेने अभ्यास होत नाही.
या पुस्तकामुळे सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले एकत्रित व विषयानुरूप अभ्यास करणे व आयोगाकडून तसेच इतर परीक्षांमध्ये पुन्हा पुन्हा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास होईल ज्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकाधिक मार्क मिळवण्यास मदत होईल.
माझ्या स्पर्धा परीक्षा काळामध्ये मला लाभलेले गुरुवर्य व वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आदरणीय श्री. सचिन ढवळे सर, श्री. एन. शाम सर, श्री, गणेश कड सर, प्रा. वामन पाटील सर (चाळीसगाव), प्रा. नितिन मुरमे सर (नागपूर), प्रा. अशोक वंजारे सर (राजगुरूनगर). प्रा. देवकर सर (भूम), प्रा. महावीर गिरी सर (मुंबई), श्री. अनिल बोडके सर (लातूर), शाहरूख बागवान सर (नाशिक), श्री. गौतम किरतउडवे (पोलीस), श्री. मंगेश शेरमाळे सर (मंगेश बुक) यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे मला यशाला गवसणी घालता आली, त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. त्यांच्या चरणी वंदन करून हा लेखन प्रपंच थांबवतो.
आगामी परीक्षेस आपणास हार्दिक शुभेच्छा !
जय हिंद….
– अतुल शेटे
सहाय्यक पोलीस निरीक्षक
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.