Navi Pidhi Navya Vata (नवी पिढी नव्या वाटा )-Dr. Prakash Amte Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen
₹200.00 Original price was: ₹200.00.₹160.00Current price is: ₹160.00.
Author : Dr. Prakash Amte
Edition : 1 ed
Language : Marathi
ISBN : 31910
Publisher : Samakaleen Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Navi Pidhi Navya Vata (नवी पिढी नव्या वाटा )-Dr. Prakash Amte Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen
मनोगत
मला आणि माझी पत्नी मंदा हिला मॅगसेसे पुरस्कार मिळाला अन् अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हेमलकशातल्या आमच्या लोकबिरादरी प्रकल्पाकडे वेधलं गेलं. आम्हाला मुलाखतीसाठी आमंत्रणं येऊ लागली, भाषणांना बोलावलं जाऊ लागलं. त्यानंतर लवकरच ‘प्रकाशवाटा’ हे आमच्या कामावरचं पुस्तक प्रकाशित झालं. हेमलकशात पहिल्या तीस-पस्तीस वर्षांत आदिवासींसाठी उभ्या केलेल्या कामाच्या गोष्टी ऐकून वाचून लोक भारावून जात होते. आदिवासींच्या व्यथा समजून घेताना गहिवरत होते. तुम्ही केवढं मोठं काम उभं केलं आहे, अशी स्तुतिसुमनं आमच्यावर उधळली जाऊ लागली होती. हे सगळंच आम्हाला नवीन होतं.
खरं तर आमच्या मते आम्ही वेगळं असं काहीच केलेलं नव्हतं. बाबांनी (माझे वडील बाबा आमटे) जे काम करायचं ठरवलं ते मी माझ्या अंगावर घेतलं होतं. माझा थोरला भाऊ विकास, त्याची पत्नी भारती आणि तिथल्या सहकाऱ्यांनी आनंदवनात राहून काम केलं, तसं आम्ही हेमलकशात. जे जे सामोरं येत गेलं त्याला आम्ही भिडत गेलो एवढंच. त्यामुळे अचानक मिळू लागलेलं लोकांचं प्रेम पाहून आम्ही भांबावलो, काहीसे सुखावलोही; पण या प्रेमाचा हेमलकशातल्या कामासाठी मोठा उपयोग झाला हेही खरंच. या मुलाखतींनंतर आमच्याकडे आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला. पस्तीस वर्षं आम्ही अतिशय काटकसरीने प्रकल्प चालवला होता. आमच्या दवाखान्यातही अगदीच कमी सुविधा होत्या. अनेक उपचारांसाठी आम्हाला पेशंट्सना चंद्रपूर किंवा थेट नागपूरला पाठवावं लागायचं. आता लोकांच्या या मदतीमुळे दवाखाना सुसज्ज करता येईल अशी शक्यता तयार झाली.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.