Adhunik Bharatacha Itihas Bhag 1 Samadhan Mahajan UPSC-MPSC
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
“आधुनिक भारताचा इतिहास” या पुस्तकाची दहावी आवृत्ती आपल्या हाती देताना आनंद होत आहे; सोबतच जबाबदारीदेखील आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ विद्यार्थिमित्रांनी या पुस्तकाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व इतिहासाचे वन स्टॉप सोल्युशन बनविले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार !
आता या नवीन वर्षात आपल्याला अनेक नवीन आव्हाने व प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. परीक्षापद्धतीत होत असलेल्या मोठ्या बदलांमुळे आपल्याला अभ्यासप्रक्रियेतदेखील बदल करावा लागणार आहे. प्रशासनातदेखील दिवसागणिक बदल होत असतात व त्याप्रमाणे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना तो बदल आत्मसात करावाच लागतो. आपण परीक्षार्थी असताना परीक्षा पॅटर्न, प्रश्नांच्या पद्धतीतील बदल, प्रश्नपत्रिकेत बदल, वेळापत्रकात बदल या समस्यांचा सामना करावाच लागतो. एकाअथनि भावी प्रशासकीय अधिकाऱ्याची मानसिकता घडविण्यात या बाबी नकळत हातभार लाबत असतात. असो !
आता आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षेतील बदल लक्षात घेता व एकूणच अलीकडील आयोगाच्या प्रश्नपत्रिकांतील बदल लक्षात घेता आपल्या पुस्तकाचीदेखील रचना बदलण्यात आली आहे. पूर्वी “आधुनिक भारताचा इतिहास” या आपल्या एकाच पुस्तकात “महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास” व “स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास” अशा अनेक घटकांचा अंतर्भाव होता.
आता या आवृत्तीपासून “आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास” व “आधुनिक भारताचा इतिहास” अशी दोन पुस्तके आपल्याला मिळतील. यामुळे पुस्तकाची रचना सुटसुटीत झाली आहे. ज्यांना केवळ महाराष्ट्राचा इतिहास वाचायचा आहे त्यांना ते वेगळे पुस्तक उपलब्ध आहे व भारताच्या इतिहासाचे टॉपिक्स हे भारताच्या इतिहासाच्या पुस्तकात आहेत.
असे करताना पहिल्याइतकाच दर्जेदार कंटेंट दोन्ही पुस्तकांत आहे. उलट या नवीन आवृत्तीत अधिक भर घालण्यात आली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थिमित्रांची नवीन आवृत्तीची मागणी सातत्याने होत होती. त्यास थोडा उशीर नक्कीच झाला आहे. पण त्यामुळे अधिक चांगली पुस्तके तयार झाली आहेत.
पुस्तकाची रचना करताना नेहमीप्रमाणे सर्व परीक्षांसाठी उपयुक्त राहील, याची काळजी घेण्यात आली आहे.
हे पुस्तक आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी योगदान देणाऱ्या ‘द युनिक अॅकॅडमी’च्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार. भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांना अगणित शुभेच्छा!
पुस्तकाबद्दल आपल्या काही सूचना व सुधारणा असल्यास नक्की कळवा.
समाधान महाजन
(राज्यकर उपायुक्त)
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.