

Khar Sangayach Mhanaje (खर सांगायचं म्हणजे)-Gangadhar Gadgil Marathi Book katha-kadambari (Novel)
₹325.00 Original price was: ₹325.00.₹276.00Current price is: ₹276.00.
Author : Gangadhar Gadgil
Edition : 2 ed
Language : Marathi
ISBN : 9788171854882
Publisher : Popular Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Khar Sangayach Mhanaje (खर सांगायचं म्हणजे)-Gangadhar Gadgil Marathi Book katha-kadambari (Novel)
गंगाधर गाडगीळ समग्र कथा मालिका: खंड ५
खरं सांगायचं म्हणजे.
महायुद्धोत्तर कालखंडातील नव्या वाड्मयीन युगधर्माचे प्रतिनिधित्व करणारे गंगाधर गाडगीळ हे मराठीतील एक अग्रगण्य कथाकार होत. कथा या साहित्यप्रकाराची संकल्पना ‘नव ‘विणे, ती अधिक खुली करणे हे श्रेय निःसंदिग्धपणे त्यांचे आहे.
गाडगीळांनी आपल्या कथालेखनातून एक नवी कथादृष्टी व्यक्त केली. कथेच्या विविध घटकांच्या स्वरूपात व योजनेत त्यांनी मूलगामी परिवर्तन घडवून आणले, त्यामागचे गमक त्यांच्या कथेतील अनुभवरूपांचे, कथार्थाचे अपारंपरिक/नवीन स्वरूप हे आहे. त्यांच्या नवकथेने मराठी साहित्यक्षेत्रात ज्या नव्या वाङ्मयीन जाणिवा रुजवल्या, त्यांतून मराठी कथा अधिक मूल्ययुक्त तसेच विविध अंगांनी समृद्ध होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या. त्यांच्या कथासाहित्यातून प्रकटलेल्या कलादृष्टीचा संस्कार केवळ कथाक्षेत्रापुरता मर्यादित न राहता एकूण मराठी ललित साहित्यावरही तो घडला, असे म्हणणे यथार्थ ठरेल.
गाडगीळांच्या कथेचे महत्त्व केवळ ऐतिहासिक स्वरूपाचे आहे, असे नाही. तिच्यातील कलापूर्णता तसेच मौलिकता स्वतंत्रपणेही लक्षणीय आहे. गाडगीळांच्या कथेचा प्रवास हा कलावंत म्हणून त्यांचा स्वत्वशोध आहे, गंभीरपणे घेतलेला एक मूल्यशोध आहे.
विनोदबुद्धी हे गाडगीळांच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचे एक आकर्षक अंग. त्यांच्या गंभीर कथा वाचतांनादेखील विनोदाचे प्रसन्न शिडकावे अंगावर उडत असतात. ‘खरं सांगायचं म्हणजे…’ या संग्रहात त्यांच्या उत्कृष्ट विनोदी कथा एकत्र वाचायला मिळतील. गाडगीळांच्या इतर लिखाणाप्रमाणेच त्यांचा विनोद देखील स्वतंत्र प्रकृतीचा आहे. सामाजिक टीकेचे अस्तरही त्यांच्या विनोदाला मुद्याम जोडलेले नाही. स्वैर कल्पकतेने बहुरंगी झालेला उच्छृंखलपणा हाच त्यांच्या विनोदाचा आत्मा आहे.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.