Humaan Sangita Dhaigude
₹499.00 Original price was: ₹499.00.₹450.00Current price is: ₹450.00.
Author : Sangita Uttam Dhaigude
Edition : 2024
Language : Marathi
Publisher : Sudhansh Publication
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
‘हुमान’ हे अलीकडील काळात वाचलेलं विलक्षण आत्मकथन आहे. लेखनशैली प्रवाही आणि निखळ वाङ्मयीन आहे. कवितांमध्येही लेखिकेचे जीवनदर्शन प्रांजळपणे घडून आलेले आहे. प्रामाणिकपणे झालेला आत्मविष्कार हा अखेरीस अभिजात उद्गम असल्याने अभिजात वाङ्मयाच्या श्रेणीचा होतो. ‘हमान’ हे आत्मकथन त्या श्रेणीला पोचलेले आहे. लेखिकेच्या लेखणीत खूप चांगले साहित्यगुण आहेत, त्यांनी त्याचे सोने करावे.
संगीता धायगुडे
– मधु मंगेश कर्णिक
‘हमान’ हे नव्या शतकाचं ‘स्त्रीमहात्म्य’ आहे. ते वाचताना पुन्हा पुन्हा लक्ष्मीबाई टिळकांची आठवण होत रहाते. संगीता आणि लक्ष्मीबाई काही सामाजिक-सांस्कृतिक मोजपट्टीने एका मापातल्या नाहीत, पण दोघींची लढाई मात्र तेवढीच खडतर. वाचकाला ‘हमान’ गुलामागत ओढीत नेते, पण ही गुलामी खूप अनुभव देऊन जाते. प्रत्येक आई-बापांनी आपल्या लेकरांच्या हातात हे पुस्तक द्यायला हवं…. मुलं स्वतःच जाणती होतील.
– प्र. ल. मयेकर
संगीता धायगुडे यांनी ‘हमान’ पुस्तकातून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. ही जीवन कहाणी तरुणांना यशासाठी उत्तेजन व प्रेरणा देणारी आहे. ‘हमान’ ही संगीता धायगुडे यांची कहाणी न राहता ती लाखो खियांच्या जीवनाशी जोडली जाते. मराठी साहित्यात एक उंची गाठण्याचे काम ‘हुमान’ ने केले आहे.
– लक्ष्मण गायकवाड
‘हमान’ हे अनेक कोड्यांचे उत्तर आहे. हे आत्मकथन केवळ खियांनाच नव्हे, तर पुरुषांना देखील प्रेरणादायी ठरेल. दुष्काळग्रस्त माण तालुक्यातील मराठी माध्यमाची मुलगी आणि जर्मनीत जर्मन भाषेवर प्रभुत्व मिळवत महाराष्ट्राचे, भारताचे प्रतिनिधित्व करणारी कर्तबगार अधिकारी, अशी दुपेडी वेणी गुंफणाऱ्या आत्मकथनाचा आकृतीबंधही अतिशय हृदयस्पर्शी आहे. लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतीचित्रे वगैरे आत्मकथनांच्या मालिकेत बसेल असं हे ‘हमान’ आहे.
– अविनाश धर्माधिकारी
‘हमान’मध्ये अतिशय चित्रदर्शी शैलीत संगीताने अनुभवलेल्या आयुष्याची खेळी रंगवली आहे. जणू एखादी कथाच आपल्यापुढे उलगडत आहे. हे पुस्तक एम.पी.एस.सी.च्या प्रत्येक विद्यार्थ्याने वाचावयास हवे. आयुष्य हे एक कोडे आहे, ते सोडवायचे कौशल्य प्राप्त केले पाहिजे हा कानमंत्र देणारे, वाचता वाचता मनभर पसरणारे, एक अस्वस्थ अनुभव देणारे हे नितांत सुंदर पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे.
डॉ. विजया वाड
Language |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.