Discipline is Destiny (Marathi) डिसिप्लिन इज डेस्टिनी शिस्त हेच नशीब स्वनियंत्रणाचे सामर्थ्य रायन हॉलिडे
स्वयंशिस्त हाच एकमेव मार्ग आहे.
स्वयंशिस्तीशिवाय संयम, धैर्य, न्याय आणि शहाणपण हे चार सगुण प्रत्यक्ष जीवनात अवतरणे केवळ अशक्य आहे.
म्हणूनच स्वयंशिस्तीला अपार महत्त्व आहे.खरे तर स्वयंशिस्त हाच सगुण आहे आणि सगुण हीच स्वयंशिस्त!
लू गेहिगपासून मार्कस ऑरेलियस, क्वीन एलिझाबेथ, जॉर्ज वॉशिंग्टन, मार्था ग्रॅहम, हॅरी टूमन, यस कॅरोल ओट्स, बुकर टी. वॉशिंग्टन,
फ्लॉइड पॅटरसनपर्यंत ज्या महान व्यक्तींच्या महानतेचे दर्शन आपण घेतले त्यांनी स्वयंशिस्तीसह वरील चार सगुणांची संयमासह सहनशक्तीची कास धरली.
एकूणच, एक अखंड, एकजिनसी, सुसंवादी माणूस हा या चार सगुणांच्या उपासनेतून उदयाला आलेला असतो. आत्मनियंत्रणातून तसेच विचारपूर्वक आणि
पूर्वनियोजनाने वरील चार सगुणांच्या दिशेने व दृष्टीने एकेक पाऊल पुढे जात राहणे, हे एक प्रकारे श्रेष्ठत्त्वाकडे जाणेच असते.
जगद्विख्यात जर्मन महाकवी गटे ह्याने रचिलेल्या नाट्यकाव्यात, ‘फाउस्ट’मध्ये म्हणतो,
संपूर्ण चांगलपणात जगणारा मनुष्य आपल्या अंधारमय भ्रांत परिक्रमणेतही सद्गुणांचा मार्ग कधी विसरत नाही.
सिसरो म्हणतो, ‘धैर्य आणि आत्मसंयम, हे घटक आनंदी जीवनासाठी अत्यावश्यक आहेत. यातही धैर्य आणि आत्मनियंत्रण असेल,
तर ते तुम्हाला कामुकतेपासून तसेच अत्यंत लालसेपासून मुक्त करतील!
मराठी अनुवाद डॉ. कमलेश सोमण जीवन आनंदगांवकर
गोयल प्रकाशन
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.