Sharad Pawar Aani Mi
₹100.00 Original price was: ₹100.00.₹80.00Current price is: ₹80.00.
Sharad Pawar Aani Mi
Author : N.D.Mahanor
ISBN No : 9789386622846
Language : Marathi
Publisher : Samakalin Prakashan समकालीन प्रकाशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Sharad Pawar Aani Mi
शरद पवार आणि मी
– ना. धों. महानोर
शरद पवार त्या दिवशी खूप रडले होते, कारण…
एस.एम.जोशी यांनी वयाची एक्क्याऐंशी वर्षं पूर्ण केली त्यानिमित्ताने २५ नोव्हेंबर ८४ला पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. देशभरातले समाजवादी, काँग्रेस, कम्युनिस्ट, रिपब्लिकन अशा अनेक पक्षांचे नेते, कार्यकर्ते या सोबतच हजारो एस.एम.प्रेमी त्या गौरवासाठी पुण्यात आले होते. या सोहळ्याच्या निमित्ताने अनेक नेत्यांच्या, समाजसेवी कार्यकर्त्यांच्या भेटी झाल्या. समारंभासाठी यशवंतराव चव्हाण येणार होते, म्हणून सगळेच वाट पाहत होते.
शरदराव व मी गाडीने पुण्याच्या रेस्ट हाऊसला पोहोचलो. पाठोपाठ दिल्लीहून फोन आला. यशवंतरावांचं दिल्लीत निधन झालं होतं. ते वृत्त ऐकून आम्हा दोघांच्याही डोळ्यात पाणी तरळलं. महाराष्ट्रभरातून फोनवर फोन यायला सुरूवात झाली. शरदराव भरल्या आवाजाने सतत फोन घेत होते. शरदरावांचा-माझा इतक्या वर्षांचा सहवास, पण ते इतके हळवे झालेले, गलबलून गेलेले त्याआधी मी कधीच पाहिले नव्हते. माझीही अवस्था त्यापेक्षा वेगळी नव्हती. राजीव गांधी, आणखी दिल्लीतल्या नेत्यांचे, महाराष्ट्रातल्या यशवंतरावांच्या जिव्हाळ्यातल्या मंडळींचे, कुटुंबियांचे फोन येत होते- ‘अंत्यविधी कुठे करायचा? मुंबई की कर्हाड?’
त्यात पुन्हा एस.एम. यांच्या गौरवासाठी आलेल्या बड्या नेत्यांची, यशवंतरावप्रेमींची रेस्ट हाऊसला गर्दी झाली. रेस्टहाऊसचा परिसर, बाहेरचे रस्ते तुडुंब भरलेले. सगळेच शोकाकुल. दुसर्या दिवशी यशवंतराव चव्हाण कर्हाडमधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार होते. पण आता सगळंच संपलं होतं. सगळाच हलकल्लोळ माजला होता. शरदराव मध्येच बाथरूमला गेले. ते बराच वेळ बाहेर आले नाहीत. मी ओळखलं, आत रडून मोकळं होत असावेत. त्यांनी बाहेर येऊन पुन्हा फोन घेतले. फोनवर एखादं वाक्य बोलायचे. त्यांनी राजीव गांधींना कळवलं, अंत्यविधी मुंबईतच करू. किर्लोस्करांच्या हेलिकॉप्टरने मी आणि शरदराव मुंबईत पोहोचलो. शरदराव पूर्णवेळ गप्पच होते. आम्ही मुंबईत पोहोचेस्तोवर विमानतळावर भेटणार्यांची प्रचंड गर्दी जमली होती.
वातावरण शोकाकुल होतं. यशवंतरावांच्या निधनानंतर वर्षभरात शरदरावांनी ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ आकारास आणलं. मुंबईत मंत्रालयासमोर त्याची इमारत उभी राहिली. यशवंतरावांच्या विचारांचं प्रतिबिंब त्यात असावं, महाराष्ट्रातल्या, देशातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तोडगे काढण्यासाठी प्रतिष्ठानातर्फे प्रयत्न व्हावेत, अशी त्याच्या रचनेमागची संकल्पना होती. पक्ष व जातीधर्मांना तिथे थारा नसेल, सार्वजनिक जीवनातील सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांना समान स्थान असेल, असं त्याचं स्वरूप होतं. प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीवर स्वत: शरदराव पवार, वसंतराव दादा पाटील, एस. एम. जोशी, लक्ष्मणशास्त्री जोशी, नीळकंठ कल्याणी, राम प्रधान, अण्णासाहेब शिंदे, दादासाहेब रूपवते, प्रा. पी. व्ही. पाटील, लक्ष्मण माने यांसारखे नेते होते.
‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ म्हणजे शरदरावांच्या राजकारणाव्यतिरिक्त सार्वजनिक जीवनातल्या कारकीर्दीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांनी अतिशय लक्ष घालून प्रतिष्ठानाच्या योजना, कार्यक्रम राबवले. प्रतिष्ठानाच्या इमारतीत मुख्य अद्ययावत सभागृहाशिवाय चार-पाच लहान सभागृहं, चर्चा, मीटिंगसाठी व्यवस्था, त्यासाठी लागणार्या अन्य सगळ्या आवश्यक सोयी करून घेतल्या. त्यामुळे तिथे सांस्कृतिक कार्यक्रमांशिवाय बँका इ.च्या लहान चर्चा, परिसंवाद हे देखील वाढले. त्यामुळे सगळ्या क्षेत्रातल्या संस्थांचे, माणसांचे पाय प्रतिष्ठानाकडे वळले. महाराष्ट्रात चार-पाच ठिकाणी प्रतिष्ठानची प्रदेशवार केंद्रंही सुरू झाली.
मदर टेरेसा, जयंत नारळीकर, मधू दंडवते, कृष्णा अय्यर यासारख्या अनेक व्यक्तिमत्वांचा प्रतिष्ठानातर्फे सत्कार झाला. त्यांचे विचार या ठिकाणी खुले झाले, जनतेशी त्यांच्या भेटी घडल्या. शेतीवर आधारित उद्योगांसाठी तात्यासाहेब कोटे, शेतीसहाय्यक मंडळ व त्याचं कार्य यासाठी विजय बोराडे, अशा संस्था, व्यक्ती यांचे सन्मान केले गेले. शंकरराव खरात, नारायण सुर्वे, यु. म. पठाण यांच्या लेखनाचा गौरव व सन्मान झाला.
युवा मंच, महिला आघाडी, त्यांचे बचत गट, आदिवासी, भटके-विमुक्त यांच्यासाठी काम करणार्यांसाठी दालन, नाटक, कला, लोककला, चित्रपट यासाठी मुद्दाम जाणीवपूर्वक काही प्रयोग व प्रयत्न, असे अनेक कार्यक्रम आजवर प्रतिष्ठानातर्फे पार पडले आहेत. महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ कलावंतांना आमंत्रित करून त्यांच्या मुलाखती, त्यांच्या कलेचं सादरीकरण या सार्याचं प्रतिष्ठानात चित्रीकरण केलं गेलं. हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासासाठीचा मोठा दस्तऐवज ठरला.
(या लेखाचा उर्वरित भाग पुस्तकामध्ये वाचा)
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.