Samajik Sanshodhan Paddhati : सामाजिक संशोधन पद्धती
₹200.00 Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00.
Author : Dr.Suman Behere
Edition : 2011
Language : Marathi
Publisher: : Vidya Prakashan / विद्या प्रकाशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Out of stock
Samajik Sanshodhan Paddhati : सामाजिक संशोधन पद्धती
लेखक : डॉ.सुमन बेहेरे
भारतीय सामाजिक संस्था” या पुस्तकानंतरचे हे माझे दुसरे पुस्तक • वास्तविक पहाता हे पुस्तकही पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार तृतीय वर्ष कला या वर्गाच्या विद्यार्थ्यांकरता लिहायचे होते. पण मग विचार आला की, परीक्षा यांच्या अभ्यासक्रमातही समाजशास्त्राच्या संशोधन पद्धतीचा समावेश आहे. एम्. फिल्. एम्. पी. एम्. एम्. एस्. डब्ल्यू, आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या याही मंडळींना पद्धतीशास्त्राची तोंडओळख व्हावी. तेव्हा सर्वसाधारणपणे • सामाजिक शास्त्रांच्या संशोधनात जेवढ्या पद्धती आणि तंत्रे वापरली जातात त्यांचा समावेश या पुस्तकात केला आहे.
खरं पहांता १९५६ साली मी जेव्हा एम्. ए. झाले तेव्हा आम्हांला कोणच्याच पातळीवर पद्धतीशास्त्र (Research Methodology) हा विषय नव्हता. १९६८ माली बडोद्याला बदली मिळाली. आसामबिहारनंतर विद्येच्या सागरातच प्रवेश होत होता. बडोदा विद्यापीठात जेव्हा पी.एच.डी. साठी प्रवेश घ्यायला गेले तेव्हा तेथले समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. पंचनदीकर यांनी मला पी.एच.डी ला नाव नोंदवायला परवानगी दिली पण मी एम.ए. झाल्याला एक तप उलटून गेले होते. आणि समाजशास्त्राचा अनेक अंगानी विकास व विस्तार झालेला होता. म्हणून मी पुन्हा रोज एम्.ए. च्या वर्गात बसून व्याख्याने ऐकावीत अशी त्यांची अट होती. तेव्हा मला जरा विचित्र आणि अवघड वाटले पण पुन्हा एम्.ए. च्या परीक्षेला बसायचे नव्हते म्हणून मी ती अट मान्य केली. रोज एम्.ए. च्या व्याख्यानांना वर्गात बसू लागले. त्याबरोबरच संशोधनाची पूर्वतयारीही सुरू होती. पण बारा वर्षांत विषय किती वाढला आहे हे कळून चुकले. त्यात डुब्बी मारून पाय जमिनीला टेकवण्याचा म्हणजे विषयावर प्रभुत्व मिळवण्याचा दोन वर्षे झटून मी प्रयत्न केला. औद्योगिक व ग्रामीण समाजशास्त्र, भारतीय सामाजिक रचना, भारतीय संस्था, समस्या एवढेच काय पण सामाजिक विचारधारा, विचारवंत, परिवर्तन, अशा सर्व शाखोपशाखांशीं सूत जमायला वेळ लागला नाही. पण पद्धतीशास्त्रासाठी बराच मेंदू शिणवावा लागला. तेव्हा लक्षात आले की हा विषय विद्यार्थ्यांना नीट समजेल अशा सोप्या तऱ्हेने लिहिला पाहिजे नाहीतर तो त्यांना अवघड व गणितासारखा नीरस वाटेल. मराठीत डॉ. पु. ल. भांडारकरांनी अत्यंत परिश्रमपूर्वक परिपूर्ण असे पुस्तक या विषयावर लिहिले आहे. पण सामान्य विद्यार्थ्यांचे दृष्टीने ते पुस्तक जरा जडच आहे असे वाटले. मुळात हा विषय मीही आत्मसात केलेला नव्हता तरी विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक लिहिण्याचा खटाटोप मी केलेला आहे. या पुस्तकातून सामाजिक संशोधनाच्या विद्यार्थ्यांना पद्धती शास्त्राची ओळख करून द्यावी म्हणजे सामाजिक संशोधनाची तंत्रे आणि पद्धती यावरचे डॉ. भांडारकरांचे पुस्तक समजायला त्यांना मदत होईल एवढाच माझा मर्यादित हेतू आहे. या विषयाचा कंटाळा न येता त्यांना त्यात रस वाटला तर माझा हेतू सफल झाला असे होईल आणि माझ्या खटाटोपाचे सार्थक झाले असे मी समजेन.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 954556786 /02024453065
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.